तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा आगार नेहमीच कुठल्या न कुठल्या गोष्टीमुळे चर्चेत असते भंगार बसेच यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो असाच काही प्रकार आज घडला तेल्हारा येथून अकोला येथे जाणाऱ्या एम एच एच 14 बीटी ४३०३ क्रमांकाच्या बसचा आपत्कालीन दरवाजा उघडावा लागून प्रवाशांना बाहेर पडावे लागले. सविस्तर वृत्त असे की तेल्हारा अकोला बस क्रमांक एम एच एच 14 बीटी ४३०३ ही तेल्हारा वरून अकोला येथे जाण्याकरिता निघाली खापरखेड फाटा येथे प्रवाशांना घेण्यासाठी थांबली असता बसचे मुख्य प्रवेश द्वार उघडत नव्हते अशातच चालक वाहक प्रवाशी यांनी दरवाजा उघडायचा प्रयत्न केला मात्र दरवाजा उघडत नसल्याने चालकाला अखेर आपत्कालीन दरवाजा उघडावा लागला प्रवाशांना आपत्कालीन दरवाज्याने खाली उतरवुन दुसऱ्या बसमध्ये बसवण्यात आले. या सर्व प्रकाराने मात्र प्रवाशाना नाहक त्रास सहन करावा लागला.