पातूर(सुनील गाडगे)– श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी विदर्भाच्या दौऱ्यावर असल्याने त्यांची पातूर येथे नियोजित बैठक होती.या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शहरात त्यांचे आगमन होताच शहर हे धारक-यांच्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमून गेले.
पातूर विभाग प्रमुख धारकरी विजय राऊत आणी त्यांच्या परिवाराने गुरूजींचे चरण धुत व औक्षण केले.पातूर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी त्यांना भगवी शाल,पुष्प व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला.
बैठकीला संबोधित करताना गुरूजींनी देव देश धर्माच्या रक्षणार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना मजबूत करण्यासाठी देशप्रेमी स्वयंसेवकांची फौज उभारण्यासाठी ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या सुचना दिल्या.
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे बत्तीस मन सोन्याचे सिंहासन स्थापित करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे अति आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.सोबतच विदर्भात जंगलाचा भाग खुप मोठा आहे त्यामध्ये मनुष्य व पशु पक्षांसाठी औषधीय गुणधर्म असलेल्या झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात करावी आणी पर्यावरणाचा होत असलेला -हास वाचवावा असा मोलाचा सल्ला दिला.
याप्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पातूर विभाग प्रमुख धारकरी विजय राऊत यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रम प्रसंगी पातूर नगरपरिषद उपाध्यक्ष धारकरी राजू उगले,भाजपा शहराध्यक्ष गणेश गाडगे,महाराष्ट्र माळी युवक संघटना शहराध्यक्ष डिगांबर फुलारी, अ.भा.म.प.प.मु.तालुकाध्यक्ष सतिश सरोदे,पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष देवानंद गहिले,प्रल्हाद माने गुरूजी,वस्ताद चंदू वानखडे,अविनाश मरकडे,प्रा.हरीदास ठाकरे,वस्ताद सुरेश श्रीनाथ,संत सिदाजी महाराज संस्थानचे विश्वस्त दगडू लोथे,शिघ्रकवी छोटू भाऊ जोशी,प्रविण इंगळे,सुरेश गव्हाळे,सुहास देवकर,हभप लक्ष्मणराव बारतासे,अंकीत बायस,संतोष खंडारे,राजेश राऊत,विनोद तेजवाल,रमेश घोरे,ठेकेदार सुनील गाडगे,रितेश सौंदळे,किरण राखोंडे,मधुकर राखोंडे,प्रकाशसिंह बायस,रविंद्र कल्याणकर,रूग्णसेवक रक्षण देशमुख,विजय मुर्तडकर,गणेश सिंह बायस,आशिष पुरी, गोपाल वडाल, विठ्ठल भाऊ,अनिल श्रीनाथ,वासुदेव गाडगे,बाळू वडतकार,शुभम बायस,विनोद वडतकार,अशोक सदर,स्वप्निल इंगळे,जीवन राऊत,चैतन्य राऊत निखिल तायडे,प्रमोद श्रीनाथ,दिलीप इंगळे,आकाश गाडगे,चेतन खंडारे,शिवम बोचरे,अथर्व गाडगे, देवानंद गाडगे,नविन गाडगे,सार्थक गाडगे,पवन पुरी,जय देवकर,प्रथमेश गोरे,श्रीमती पार्वताबाई हाडके,श्रीमती रत्नाबाई राऊत,रेखा तायडे,देवका खंडारे,पुष्पा घोरे,संगिता हाडके,ऊषा राऊत,अलका राऊत,वर्षा देवकर,सिमा गाडगे,कुसूमबाई उगले,अर्चना खंडारे,मंगला गाडगे,दुर्गा श्रीनाथ,अंजली राऊत,प्राची राऊत,वैष्णवी राऊत,आस्था सावत, रोशनी म्हात्रे,सावी श्रीनाथ यांच्या सह शेकडो नागरिक उपस्थित होते.
यावेळी पातूर पोलीस स्टेशन च्या अधिका-यांनी खूप चांगला चोख बंदोबस्त ठेवला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश सरोदे यांनी करून प्रास्ताविक डॉ.शिवकुमारसिंह बायस यांनी केले तर आभार प्रदर्शन धारकरी विजय राऊत केले.