अकोला : अकोला शहरात राज्य कामगार विमा योजना दवाखाना सुरू असून येथे प्राथमिक स्वरूपाचे उपचार केले जातात मोठ्या आजाराकरीता नागपूर मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल ला रेफर केले जाते, एखाद्या रूग्ण जास्त सिरियस असला तर नागपूर पोहचेपर्यंत त्या रूग्णाचा मृत्यु होऊ शकतो म्हणून अकोला येथे मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल राज्य कामगार निगम योजनेशी अटॅच समाविष्ट करावे व कामगारांना होणा-या त्रासासुन सुटका करावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी केली होती.
त्यांच्या तक्रारीची दखल घेत विमेदार रूग्णांने आकस्मिक स्वरूपात खाजगी रूग्णालयात तातडीच्या प्रसंगी आंतररूग्ण वैद्यकीय उपचार घेतल्यास त्याची वैद्यकीय खर्च प्रतिपुर्ती सि.जी.एच.एस दराप्रमाणे करण्यात येते. तसेच खाजगी हॉस्पीटल टाय अप करण्याची प्रक्रीया ही वरीष्ठ कार्यालयाकडून होत असून सद्यस्थितीत अकोला, वाशिम, बुलढाणा येथील रा. का.वि.योजना सेवा दवाखाना, अकोला येथिल संलग्णीत असलेल्या विमेदार रूग्णासांठी महा. राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत कॅशलेस सेकंडरी सुविधांसाठी सुर्यचंद्र हॉस्पीटल, गौरक्षण रोड, अकोला हे (टाय अप) संलग्णीत करण्यात आलेले आहे.
सुर्यचंद्र हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र राज्य कामगार विमा योजना निगम अंतर्गत अत्यंत उत्तम व चांगल्या प्रकारे सुविधा मिळणार असून आता कामगार रुग्णांना विमेदारांना नागपूर जाण्याची गरज नसून अकोल्यातील सूर्यचंद्र हॉस्पिटल येथे (राज्य कामगार विमा योजने अंतर्गत) मोफत उपचार होणार असून गेल्या दोन तीन वर्षापासून कामगार विमेदारांना अकोल्यातच उपचार मिळावेत म्हणून सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे शासनाशी लढा देत होते. त्यांच्या लढा यशस्वी झाला असून कामगारांनी त्यांचे आभार मानले. कामगार विमेदारांनी आपले व कुटुंबायाचे उपचार नव्याने टाय अप झालेल्या सुर्यचंद्र हॉस्पिटलमध्ये करून लाभ घ्यावेत असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे तथा सुर्यचंद्र हॉस्पिटल चे संचालक डॉ विक्रांत इंगळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.