पुणे : यंदा देशात सर्वच भागात सप्टेंबर महिन्यात पडेल परंतु, तो एक सारखा राहणार नाही. सरासरी 91 ते 109 टक्के पाऊस पडेल असा अंदाज असला तरी बहुतांश भागात सरासरीपेक्षा 9 ते 10 टक्के कमीच राहील, तसेच यावेळी ऑगस्टमध्येच तापमानात मोठी वाढ झाल्याची माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी गुरूवारी दिली. दरम्यान यंदाच्या ऑगस्टमध्ये शंभर वर्षातील सर्वात नीचांकी पाऊस झाल्याचेही त्यांनी सांगितले.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचलाक डॉ.मृत्युजंय महापात्रा यांनी गुरूवारी ऑनलाईन पत्रकार परिषदेत सप्टेंबर महिन्यात कसा पाऊस राहिल याचा अंदाज जाहीर केला. हा अंदाज यंदाच्या मान्सून मधील शेवटचा आहे. महापात्रा म्हणाले,“ सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशभरात 91 ते 109 टक्के एवढा सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, बहुतांश भागात तो सर्वसामान्यपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. यात दक्षिण व मध्य भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली.