अकोला : शिवरायांनी स्वकर्तृत्वासह राजनिती, समान न्याय, अन्यायास कठोर शासन व कर्तृत्ववानांना संधी देऊन रयतेच्या मनातील खरया लोकशाहीची पायाभरणी केली आणि शिवराज्याभिषेकदिनी देशातील पहिले लोकशाहीचे राज्य निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र महायुवा वक्ता पुरस्कार विजेते रुग्णसेवक व सुप्रसिद्ध शिवव्याख्याते सौरभ वाघोडे यांनी केले. ते अकोला येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित जिजाऊ सृष्टी विचार मंचतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्या निम्मित आयोजित व्याख्यानाच्या ‘व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा महानगर अध्यक्ष मा. विजू भाऊ अग्रवाल, प्रमुख पाहुणे संजय गोतफडे, पवन महल्ले, डॉ. भरत भडांगे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व कुलस्वामिनी आई भवानी माता यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.सौरभ वाघोडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा या विषय मांडताना अंगावर शहारे आणणारे अनेक ऐतिहासिक प्रसंग उभे केले. धाडस शिकविणारी राजमाता, स्वराज्याच्या या अग्नि कुंडामध्ये प्राणाची आहुती देणाऱ्या मावळ्यांच्या बलिदाना आणि समर्पणानाने स्वराज्य निर्माण होऊ शकले, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे एखादा राजा गादीवर बसणं नव्हे तर गोरगरीब दिन दलित शेतकरी कष्टकरी सर्व सामान्यांचे खऱ्या अर्थाने लोकशाहीचे राज्य त्या दिवशी निर्माण झाले असे प्रतिपादन सौरभ वाघोडे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रतीक खराडे ,चंद्रमोहन इंगले यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी — शिवराज्याभिषेक उत्सव समिति छत्रपति शिवाजी महाराज पार्क, पवन महल्ले युवमंच, जय जगदम्बा आखाड़ा, स्वराज्य नवदुर्गा उत्सव मंडळ, छत्रपति फिटनेस सेंटर,संत गजानन महाराज मंदिर देशमुख पेठ, संदीप बाथो, राहुल लोहिया, सागर तिवारी,कैलास चव्हाण, संतोष बारस्कर, संतोष चव्हाण, ऋषि जगताप, वेदान्त ढगे, अक्षय वानखड़े, आदित्य नागलकर,रोशन कसाब,अमित मानकर, गणेश माने, चेतन मानकर, ओम चव्हाण,ओम असलमोल, करण रावनकर, मयूर ताले, यशवंत चंदन, प्रथमेश बोर्डे,अनिकेत लव्होले, सुपेश अहेरकर, यांनी प्रयत्न केले.