तेल्हारा(विलास बेलाडकर)- अडसूळ येथील विश्वशांती बौद्ध विहाराच्या काही जागेवर गावातीलच एका व्यक्तीने मागील 3 वर्षांपासून अतिक्रमण केलेले आहे. सदर अतिक्रमण हटविण्यात यावे करीता गावातील विश्वशांती बौद्ध विहार महिला मंडळाने मागील 3 वर्षापासून ग्रामपंचायत येथे पाठपुरावा केला, परंतु ग्राम पंचायत मधून त्यांना उडवाउडवीची उत्तरे ग्राम सेवक ह्यांनी दिली. मार्च 2023 ला मा गट विकास अधिकारी ह्यांना निवेदन दिले नंतर मा ग्राम सेवक वाडेकर ह्यांनी जागेवर येऊन दिशाभूल करणारी मोजणी करुन दिली. ज्या मध्ये शासकीय रस्त्यावरील मोकळी जागा मोजून देण्यात आली जेंव्हा महिलांनी त्याच्यावर आक्षेप घेतला तेंव्हा त्यांनी मी ह्याच पध्दतीने मोजणी करन देईल असे महिलांना ठणकावले. त्या नंतर ग्राम सेवक वाडेकर ह्यांनी जागा मोजणी करतांना दिशाभूल केली ह्या बाबतीत तक्रार ही एप्रिल च्या पहिल्या हप्त्यात मा गट विकास अधिकारी तेल्हारा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला ह्यांना केली असता त्यावर अजून पण कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. उलट ग्राम सेवक ह्यांनी महिला मंडळाला तुमच्या मालकीचे कागदपत्रे सादर करा असे पत्र दिले.
अडसूळ येथील महिलांनी सदर जागा 6 मे बौद्ध पौर्णिमा च्या अगोदर जर खाली करून नाही मिळाली तर अडसूळ येथील समस्त महिला पंचायत समिती तेल्हारा येथे येऊन मा गट विकास अधिकारी ह्यांच्या कक्षात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेऊन त्रिसरण आणि पंचशील पठन करून बौद्ध पौर्णिमा साजरी करु असे निवेदन दिले. निवेदनावर पद्मा शत्रूघन तायडे अध्यक्ष विश्वाशांती बौद्ध विहार अडसूल आणि असंख्य महिलांच्या सह्या आहेत.