अकोला दि. 25 :- अकोला जिल्हा व अकोट तालुका न्यायालयांमध्ये लोक अदालतीस 16 प्रलंबित प्रकरणाचा समेट घडून आला. त्यात विविध प्रकरणात तडजोड होवून 61 लाख 77 हजार 538 रुपयांची वसुल झाली, अशी माहिती जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण सचिव योगेश पैठणकर यांनी दिली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार अकोला जिल्हा व अकोट तालुका न्यायालयांमध्ये शनिवारी (दि.25) विशेष लोक अदालतीस प्रकरणे निकाली काढण्यात आले. त्यात प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण 337 विशेष लोक अदालतमध्ये तडजोडीकरिता ठेवण्यात आली. यापैकी 16 प्रकरणे समेट घडवून निकाली काढण्यात आली. यामध्ये मोटार वाहन अपघात प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे व वैवाहीक वाद इत्यादी प्रकरणाचा निपटारातून 61 लाख 77 हजार 538 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
विशेष लोक अदालतीमध्ये श्रीमती सुवर्णा केवले व जिल्हा न्यायालयाचे न्यायाधिश यांनी मार्गदर्शन केले.तसेच त्याच्या उपस्थितीत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आले. अकोला जिल्हा न्यायालयात पॅनल प्रमुख म्हणुन दिवाणी न्यायाधिश एन. एस. पुरी व पॅनल सदस्य म्हणुन विधीज्ञ सुमेध डोंगरदिवे यांनी कामकाज पाहिले. तसेच अकोट येथील न्यायालयात पॅनल प्रमुख म्हणुन जिल्हा न्यायाधिश अकोटचे चकोर बावीस्कर आणि पॅनल सदस्य विधीज्ञ एस. पी. खलोकार यांनी कामकाज पाहिले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधिक्षक डी. पी. बाळे, संजय व्ही. रामटेके, राजेश कृ. देशमुख, आर. बी. तेलगोटे, हरिष इंगळे, शाहबाज खान व इतर न्यायीक कर्मचारी, विधी स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. लोक अदालत पार पाडण्याकरिता अकोला बार असोसिएशन यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश सु. पैठणकर यांनी दिली.