• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जागतिक महिला दिन ; अबला नव्हे; स्वतःला ‘सबला’ समजा- जिल्हाधिकारी निमा अरोरा : जिल्हाधिकारी कार्यालयात बचतगटांचे स्टॉल्स, महिलांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम

Our Media by Our Media
March 8, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, उत्सव, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य
Reading Time: 1 min read
84 1
0
जी ए सी फोटो
12
SHARES
609
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.८ :- आपल्या कामाचे मूल्यमापन कोणी तरी करेल, ही अपेक्षा ठेवू नका. स्वतःला ‘अबला’ समजणे बंद करा व स्वतःला ‘सबला’ समजा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज समस्त महिला वर्गाला केले.

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन भवनात करण्यात आले. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी निमा अरोरा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, प्रतिक्षा तेजनकर. माविमच्या वर्षा खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात महिलांना रोजगार विषयक मार्गदर्शनासाठी  काजल राजवैद्य, कायदेविषयक मार्गदर्शनासाठी  ॲड. संगिता भाकरे, महिला सक्षमीकरण याबाबत मार्गदर्शनासाठी  दीपिका देशमुख या उपस्थित होत्या. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग द.ल. ठाकरे, तसेच विविध विभागप्रमुख सर्व महिला कर्मचारी, विविध सामाजिक संघटनांच्या महिला सदस्य आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. महिलांच्या आरोग्यविषयक डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी माहिती दिली. जयश्री दुतोंडे यांनीही उपस्थित महिलांशी हितगुज केले. जिल्हाधिकारी अरोरा म्हणाल्या की, ज्या दिवशी आपल्या कामाची दखल कुणीतरी घ्यावी याची आवश्यकता आपणास भासणार नाही त्यादिवशी आपण स्वावलंबी झालो असे समजावे.  गृहिणी म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला ह्या काहीच करत नाहीत असे कुणीही समजू नये. अर्थशास्त्रातही आता गृह अर्थशास्त्र म्हणून संकल्पना मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे कमावत्या पुरुषाच्या बरोबरीने व समांतर उत्पादक काम गृहिणी करत असते, असेही त्यांनी सांगितले. स्वतःच्या आवडीने काम करावे व आपल्या कामाची गुणवत्ता आपणच ठरवावी,असेही त्यांनी उपस्थित महिलांना सांगितले. प्रास्ताविक प्रतीक्षा तेजनकर यांनी तर सूत्रसंचालन वर्षा भुजाडे यांनी केले.

बचतगटांच्या स्टॉल्सला प्रतिसाद

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात महिला स्वयंसहायता बचतगटाच्या उत्पादन विक्रीचे स्टॉल्स लावण्यात आले होते. या विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग द.ल. ठाकरे, वर्षा भुजाडे, अधीक्षक शिल्पा बोबडे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात ५२ स्टॉल्स लावण्यात आले होते. याठिकाणी मान्यवरांनी भेटी देऊन उत्पादनांविषयी माहिती जाणून घेतली. तसेच महिला दिनानिमित्त केक कापण्यात आला. दिवसभर महिलांची विक्री प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी होती.

जागतिक महिला दिनानिमित्त स्तन कर्करोग तपासणी शिबीर

 

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या स्तन कर्क रोगाबाबत जनजागृती आणि उपचार अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 63 महिलांचे स्तन कर्करोगांचे स्किनिंग करण्यात आले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येक बुधवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत स्तन कर्करोगाबाबत बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये तपासणी, निदान आणि उपचाराबाबत मार्गदर्शन केल्या जाईल, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.‍मिनाक्षी गजभिये यांनी दिली.

Previous Post

जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रचार रथ मार्गस्थ १४९ गावांमध्ये पोहोचणार शासनाच्या योजनांची माहिती

Next Post

तेल्हारा तालुक्यातील सात गावांत 115 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
धान्य

तेल्हारा तालुक्यातील सात गावांत 115 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

satish kaushik

Satish Kaushik Death : अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.