• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, July 2, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

PM Narendra Modi: केंद्र सरकारमुळे देशातील कोट्यवधी रुग्णांची ८० हजार कोटींची बचत

Our Media by Our Media
March 6, 2023
in Featured, आरोग्य, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य
Reading Time: 1 min read
90 3
0
narendra-modi-on-corona
13
SHARES
666
VIEWS
FBWhatsappTelegram

PM Narendra Modi: देशातील ९ हजार जनऔषधी केंद्रांवर बाजार भावापेक्षाही स्वस्त औषधी उपलब्ध आहेत. गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबियांची त्यामुळे २० हजार कोटींची बचत झाली आहे. ‘आयुष्मान भारत’योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या पाच लाखांपर्यंतचा नि:शुल्क उपचारामुळे देशातील कोट्यवधी रुग्णांची आजारावर खर्च होणाऱ्या जवळपास ८० हजार कोटींची बचत झाली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील रिसर्चवर आयोजित वेबिनारला संबोधित करतांना केले. (PM Narendra Modi)

‘पीएम आयुष्मान भारत’ योजनेतील आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या माध्यमातून ‘क्रिटिकल हेल्थ इन्फ्रा’ छोट्या शहरापंर्यंत घेवून जाण्यात येत आहेत. छोट्या शहरांमध्ये नवीन रुग्णालयांसह आरोग्य क्षेत्राशी संबंधित एक संपूर्ण ‘इको सिस्टम’ विकसित होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. देशात चांगला तसेच आधुनिक आरोग्य पायाभूत सुविधा असणे अत्यंत आवश्यक आहे. देशात दीड लाख ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’ उभारले जात आहेत.या केंद्रांमध्ये मधुमेह, कर्करोग तसेच हद्याशी संबंधित गंभीर आजरांच्या तपासण्यांची सुविधा उपलब्ध केली जाईल, असे पंतप्रधान म्हणाले.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

अशात देशाची परदेशावरील निर्भरता कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. भारतात कुठल्याही आजारावरील उपचार अर्फोडेबरल’ बनवण्यास सरकारने प्राधान्य दिले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. अस्वच्छेतमुळे होणाऱ्या आजारांपासून देशवासियांचा बचाव करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान असो, धुरामुळे होणाऱ्या आजारांपासून बचावासाठी उज्वला योजना असो अथवा दूषित पाण्याच्या आजारापासून बचावासाठी जल जीवन मिशन असो, या सर्व योजनांचे चांगला परिणाम दिसून येत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

कधी कधी संकट स्वत:ला सिद्ध करण्याची संधी घेवून येते. कोरोना काळात भारतील औषध निर्माण क्षेत्राने अभूतपूर्वरित्या संपूर्ण जगाचा विश्वास संपादित केला. याचे आपण भांडवल केले पाहिजे, असे मोदी म्हणाले. ड्रोन टेक्नोलॉजीमुळे औषधांच्या वितरणावर तसेच तपासण्याशी संबंधित लॉजिस्टिक मध्ये एक क्रांतिकारी परिवर्तन दिसून येत आहे. ‘आत्मनिर्भर’बनायचेच आहे या ध्येयाने उद्योजकांनी कुठल्याही तंत्राचे आयात करण्यापासून वाचले पाहिजे. (PM Narendra Modi)

गेल्या काही वर्षांमध्ये २६० हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आले आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमातील जागांची संख्या २०१४ नंतर आज दुप्पटीने वाढली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांजवळ १५७ नर्सिंग कॉलेज सुरू करणे वैद्यकीय मनुष्यबळात भर घालण्यासाठी टाकण्यात आलेले एक मोठे पावूल असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

Previous Post

विजाच्या कडकडासह अतिवृष्टीचा अंदाज; सतर्कतेचा इशारा

Next Post

डाक अदालत शुक्रवार (दि.10)

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
Dak-Adalat2

डाक अदालत शुक्रवार (दि.10)

Start up Conclave

लोकजागर मंच पुढाकाराने विदर्भात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्टार्ट अप परिषद

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.