अकोला,दि. 23 :- शासनाच्या आधारभूत धान्य खरेदी योजनेअंतर्गत हंगाम २०२२-२३ मध्ये तूर खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ७/१२ नोंदीनुसार तूर पिकाची ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी पी.एस. शिंगणे यांनी केले आहे.
अकोला जिल्ह्यात बाळापूर, पातुर, पारस, तेल्हारा, बार्शी टाकळी, उगवा व थार एमआयडीसी तसेच वाशिम जिल्ह्यात मालेगाव याठिकाणी मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने तूर पिकाची ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. त्यासाठी दि. ६ मार्च २०२३ पर्यंत मुदत दिली आहे. तसेच खरेदीसाठी ३० एप्रिल २०२३ पर्यंत मुदत आहे. तरी सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांनी ७/१२ वरील पीक पेऱ्यानुसार ऑनलाईन नोंदणी करुन हमी दराचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.