तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा ते अकोला प्रवासा दरम्यान पडलेली एका वृद्ध मुस्लिम महिलेची पर्स ही प्रवासा दरम्यान बस क्र. ४३०३ मध्ये पडली होती. सर्व प्रवासी निघून गेल्यावर त्या बसमधील पडलेली पर्स ही वाहक यांना दिसली त्यांनी लगेच चालक यांना ह्यांची माहिती दिली व त्या पर्स मध्ये पाहले असता त्यात जवळपास एक ते दीड लाख रुपयांची सोन्याची पोत होती. त्यामुळे त्यांनी लगेच ती पर्स कुणाची पडली याबाबत आगर प्रमुख यांना सूचित केले व डेपोच्या स्पिकर वर त्याची माहिती देण्यात आली.
त्यामुळे आगोदर पर्स हरवलेल्यामहिला आरडा ओरड करीत होती तोच तिला सुखद धक्का बसला की आपली पर्स सापडली आहे ती डेपो मधून घेऊन जावी त्यामुळे ती मुस्लिम महिला बोलावून तिला पर्स देण्यात आली. तिने सर्वाना आशीर्वाद देऊन आज ही प्रामाणिक कर्मचारी आहेत. असे उद्गार काढले त्यामुळे तेल्हारा डेपो विभाग अकोला येथील चालक जामनिक व वाहक सोसे मॅडम यांनी प्रामाणिकपणे परत केलीत्यामुळे सर्व स्तरावरुन आगर विभागा कडून त्यांचे वर शुभेच्छा कार्य तत्परता वर्षाव होत आहे त्यामुळे बस चा प्रवास सुखाचा प्रवास हा अनुभव जणू खरा ठरला आहे. दुसरीकडे मात्र गेली दिड दोन महिने पगार होत नसतानाही कर्मचाऱ्यांनी दाखविलेला प्रामाणिक पणा सर्वांचे कौतुकास पात्र ठरत आहे.