अकोला,दि.२०:- आद्य मराठी पत्रकार ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सदाशिव शेलार यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, ज्येष्ठ पत्रकार हरिदास चेडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.