अकोला- वत्सल मेडिकल रिसर्च फाऊंडेशन अकोलाच्या वतीने श्री स्व. वसंतराव भागवत यांच्या प्रथम पुण्यस्मरणा पित्यार्थ मागच्या महिन्यात पंचगव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सौरभ वाघोडे यांच्या प्रयत्नातून घेण्यात आलेल्या मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरामध्ये बरेच गरजू रुग्ण ज्यांची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत हलकीची असल्याने त्यांना शत्रक्रियेचा व गॅस्ट्रोस्कोपी खर्च हा परवडणारा नसल्याने त्या सर्वच रुग्णाचे कल्पकृपा वत्सल हॉस्पिटल येथे रूग्णांचे मोफत शस्त्रक्रिया गॅस्ट्रोस्कोपी शिबिर दिनांक १२.०२.२०२२ रोजी पार पळाले. या कार्यक्रमध्ये सर्वप्रथम स्व. वसंतराव भागवत यांना श्रधांजली वाहून शस्त्रक्रिया शिबिराला सुरवात झाली.
या शिबिरात डॉ. अरुण भागवत शल्यचिकीत्सक, डॉ. कल्पना भागवत श्त्री रोग तज्ञ, डॉ. नरेंद्र भागवत न्यूरोसर्जन, डॉ. नम्रता भागवत वेदना निवारण तज्ञ, डॉ. अभिषेक भागवत शल्यचिकीत्सक, डॉ. हिता भागवत नेत्र रोग तज्ञ, डॉ. अमित अग्रवाल भूलतज्ञ व श्री गजानन चोपडे यांनी सेवा दिली सर्व रुग्णांना शस्त्रक्रिये नंतर जेवणाची व्यवस्था हॉस्पिटलच्या माध्यमातुन करण्यात आली होती. शिबिर यशस्वी करण्यासाठी वत्सल हॉस्पिटल स्टाफ,सर्व नर्सिंग स्टाफ पंचगव्हाण येथील सर्वच सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले.