बारावीच्या (उच्च माध्यमिक) प्रमाणपत्र परीक्षेचा कार्यक्रम जाहीर झाला असून २१ फेब्रुवारी इंग्रजी पेपरने परीक्षांचा श्री गणेशा होणार आहे. २० मार्च सोमवार पर्यंत वेळापत्रकानुसार विषयावर परीक्षा घेण्यात येणार आहेत. (First regular exam after Corona HSC Examination Instructions to provide necessary facilities to students nashik news)
कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी नियमित परीक्षा होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा फार्मवर नमुद केलेल्या केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी दिलेल्या वेळे आधी येणे बंधनकार आहे.
उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांला शिक्षण खात्याच्या नियमानुसार केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. कॉपी प्रकरणाला आळा बसण्यासाठी विभागाकडून अधिसूचना जारी करून नवे व कडक नियम करण्यात आले आहे.
शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात काही उच्च माध्यमिक शाळांमध्ये परीक्षा केंद्र मिळालेले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरणे आवश्यक आहे, असे शिक्षण विभागाकडून सुचना करण्यात आलेल्या असतात.
परीक्षा केंद्रांवर संबंधित शिक्षण खात्याकडून परीक्षा पूर्वी पहाणी करणे गरजेचे ठरणार आहे. शिक्षण विभागाकडूनही परीक्षेची पूर्ण तयारी केली जाते. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सुविधा पासून वंचित राहणार नाही याची परीक्षा केंद्र शाळांनी दखल घेणे महत्त्वाचे आहे.