अकोला,दि.28 :- साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ(मर्या.) अंतर्गत सन 2022-23 या आर्थीक वर्षाकरीता जिल्ह्यातील मातंग समाजाकरीता थेट कर्ज योजनातंर्गत प्रस्ताव मागविण्यात आले आहे. पात्र व इच्छुक अर्जदारांनी कर्ज प्रस्तावाकरीता दि. 24 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे(मर्या.) जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
थेट कर्ज योजनाकरीता आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराचे सिबील केंडीट स्कोअर 500 असावा, जातीचा दाखला, आधार कार्ड, शैक्षणिक दाखला, रेशनकार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स प्रत, अनुदान किवा कर्जाचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषना पत्र, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या ठिकाणची भाडेपावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा(नमुना नं.8 लाईट बिल व टॅक्स पावती), ग्रामपंचायत, नगरपालीका, महानगरपालीका यांचे नाहरकत प्रमाणपत्र किंवा शॉप ॲक्ट परवाना, व्यवसाय संबधीत तांत्रिक प्रमाणपत्र, व्यवसाय दरपत्रक, तीन पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला, अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल इ. आवश्यक राहिल.
मातंग समाजातील 12 पोटजातीकरीता थेट कर्ज योजनातंर्गत जिल्ह्याकरीता 30 चे उदिष्ट देण्यात आले असून 1 लक्ष रुपये प्रकल्प मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांचे वय 18 ते 50 वयमर्यादेतील असावा. शहरी व ग्रामीण भागातील अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा तीन लक्ष पेक्षा जास्त नसावा. तसेच अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. नियमाप्रमाणे आवश्यक कागदपत्राची पुर्तता करुन अर्ज तीन प्रतीत साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ(मर्या.) जिल्हा कार्यालय, कौलखेड रोड, अकोला येथे स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून दाखल करावे. त्र्ययस्थ किंवा मध्यस्था मार्फत कर्ज प्रकरणे स्विकारले जाणार नाही. उदिष्टापेक्षा जास्तीचे कर्ज प्रस्ताव प्राप्त झाल्यास लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केल्या जाईल. थेट कर्ज योजनातंर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांचे कर्ज प्रकरण जिल्हा लाभार्थी निवड समितीच्या मान्यतेने प्रादेशिक कार्यालयास मंजूरीसाठी शिफारस करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक यांनी दिली.