Bharat Jodo Yatra : – राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज ( दि. ६ ) दुसरा दिवस आहे. सकाळी सहाच्या सुमारास झालावाडच्या क्रीडा संकुलातून यात्रेला सुरुवात झाली. झालावाडमधून भारत जोडो यात्रा कोटा जिल्ह्यात प्रवेश करेल. झालावाडमध्ये राहुल गांधींनी भाजप कार्यकर्त्यांना ‘फ्लाईंग किस’ दिला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारत जोडो यात्रेला सकाळी सहा वाजता झालावाडच्या क्रीडा संकुलातून सुरुवात झाली. यात्रेच्या मार्गावर भाजपचे कार्यालयही होते. या कार्यालयाच्या टेरेसवर राहुल गांधी यांच्या यात्रेला पाहण्यासाठी लोक सकाळपासून जमले होते. यात्रेत राहुल गांधी भाजप कार्यालयासमोरून जात होती. या वेळी राहुल गांधी यांनी भाजप कार्यकर्त्यांचे स्वागत फ्लाइंग किस देऊन केले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राजस्थान सुरु असलेली भारत जोडो यात्रा कोटा जिल्ह्यात दाखल होणार आहे. देवरी घाटा, सुकेत, हिरिया खेडी मार्गे मोरू कलान, खिंडीचे क्रीडांगण येथे पोहोचेल. येथे रात्रीचा विश्रांतीचा प्रवास केला जाईल.९ डिसेंबरच्या सकाळपर्यंत भारत जोडो यात्रा कोटामध्येच राहणार आहे. तीन दिवसांच्या प्रवासानंतर 8 डिसेंबर हा चौथ्या दिवशी विश्रांतीचा दिवस घोषित करण्यात आला आहे. मदन मोहन मालवीय फार्म हाऊस येथे ही यात्रा थांबणार आहे.
Top 15 Bollywood Celebrities Who Live A Super Luxurious Life