अकोला,दि. 1:- शहरातील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांच्या तंत्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी या प्रदर्शनीच्या कलाकृती व तंत्रकृतीला भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक केले.
तंत्र प्रदर्शनीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्फोर्मेशन ऍन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, सेक्रेटरीयल प्रॅक्टिस, ड्रेस मेकिंग, बेसिक कॉस्मेटोलॉजी, बेकर अँड कन्फेक्शनर, फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन, फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी इत्यादी व्यवसायांच्या तंत्रकृतीचे सादरीकरण करण्यात आले . या प्रदर्शनीला विविध शाळा आणि शिक्षकांनी भेट दिली. यावेळी उद्योजक तथा संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयंत पडगिलवार, कौशल्य व नाविन्यता विभागाचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय ठाकरे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस.पी. झोडपे, आयटीआय (मुलींचे) प्राचार्य शरदचंद्र ठोकरे यांनी परिश्रम घेतले.
Top Bollywood Celebrities With Expensive Cars