अकोला,दि.२९ :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने कोविड-१९ लसीकरणाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कोविड लसीकरणाच्या जनजागृतीचा भाग म्हणून जिल्ह्यातील उर्दु शाळांमध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आज पारितोषिक वितरण करुन गौरविण्यात आले. यावेळी सहभागी शाळांमधील प्रथम तीन विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनिष शर्मा या मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते आशा सेविका व विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी सचिन उजवणे, उमेश ताठे, वाय आरजी केअर या संस्थेचे जिल्हा प्रकल्प समन्वयक मोहसिन मणीयार, रविकुमार मांजरे, समाधान क्षीरसागर, मिना इंगळे, विनोद सरदार यांनी परिश्रम घेतले.