अकोला,दि. 28 :- नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय व युवा अकॅडमी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू युवा केंद्र अकोला येथील प्रांगणात शनिवार दि.26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.
प्रमुख मार्गदर्शक डॉ.अशोक इंगळे यांनी संविधान व संविधानाप्रती कर्तव्याची माहिती देऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रश्नोत्तर स्पर्धा घेऊन विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश चंद्र भट यांनी युवकांना मार्गदर्शन करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आपल्या शुभेछा दिल्या. उदय देशमुख यांनी प्रास्ताविकात संविधान दिन कार्यक्रमाची रूपरेषा सांगून उपस्थितांना उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्याच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ.अशोक इंगळे, युवा अकॅडमीचे संचालक अजय कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश चंद्र भट, नेहरू युवा केंद्राचे वित्त व कार्यक्रम पर्यवेक्षक उदय देशमुख, युवा अकॅडमी व नेहरू युवा केंद्राचे युवक व युवती उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन हरिओम राखोंडे यांनी तर आभार प्रदर्शन नम्रता आठवले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मयुर सावळे, हरिओम राखोंडे, नम्रता आठवले, अमोल भटकर, राधा खंडारे यांनी परिश्रम घेतले.
Top Bollywood Celebrities With Expensive Cars