अकोला,दि. 28 :– महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळच्या वतीने गटस्तरीय कौमी ऐकता सप्ताह व महिला दिनानिमित्त गुरुवार दि. 24 नोव्हेंबर 2022 रोजी ललित कला भवन, अकोला येथे महिला मेळाव्यामध्ये मार्गदर्शनाचे शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळाचे प्राध्यापक गीता उनोने, देशमुख महिला मंडळ सेक्रेटरी तथा ज्येष्ठ रंगकर्मी नयनाताई देशमुख, खंडेलवाल इंग्लिश स्कूलचे मुख्याधिकारी पूर्वा कुलकर्णी यांनी भारतीय समाजातील महिलांचे महत्त्व व राष्ट्र उभारणीच्या विकासामधील त्यांची भूमिका या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले.
तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अजय कोरे यांनी केले तर मार्गदर्शन शिबीर कामगार कल्याण अधिकारी वैशाली नवघरे, निरीक्षक बि.टी.भेले यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल महाले, मनीष सरदार, मंदा उमाळे, रेखा अंभोरे, सविता सरप, अनिता रेठे, किरण भोगे, संध्या मेश्राम, जिजाबाई वराळे, शोभा गडम, मिना दाभाडे, सविता पवार, माया डाबरे यांनी सहकार्य केले.