• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 3, 2023
36 °c
Akola
36 ° Sun
36 ° Mon
37 ° Tue
37 ° Wed
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांचे महाराष्ट्राला पत्र : छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून..

Our Media by Our Media
November 23, 2022
in Featured, ठळक बातम्या, फिचर्ड, महाराष्ट्र, राजकारण, राज्य
Reading Time: 2 mins read
108 4
0
Rahul Gandhi
16
SHARES
797
VIEWS
FBWhatsappTelegram

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेले काही दिवस देशभरात भारत जोडो यात्रा (Congress Bharat Jodo Yatra) सुरु आहे. या यात्रेने ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात प्रवेश केला. जवळपास दोन आठवडे ही यात्रा महाराष्ट्रात होती. दोन दिवसापूर्वी भारत जोडो यात्रा आंध्रप्रदेशमध्ये प्रवेश केला. राहुल गांधी यांनी महाराष्ट्राला निरोपाचं पत्र लिहलं आहे. राहुल गांधी यांच महाराष्ट्राला लिहलेलं पत्र (Rahul Gandhi letter) त्यांच्याच शब्दांमध्‍ये.

राहुल गांधींनी महाराष्ट्रातील जनतेला लिहिलेलं पत्र

हेही वाचा

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जिल्ह्यातील 734 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित

महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा शुभारंभ देगलूर येथून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सुरु झाला आणि शिवाजी महाराज यांचा मातृ जिल्हा, (जिजाऊ मांसाहेबांचा जन्म जिल्हा) बुलढाणा येथून ती मध्य प्रदेशमध्ये जात आहे. महाराष्ट्रातील छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साईबाबा आणि गजानन महाराज तसेच येथील सर्व संतांच्या विचारांपासून प्रेरणा घेत आम्ही वाटचाल करणार आहोत. या संतांच्या विचाराने शेकडो वर्ष समतेचा, सामाजिक न्यायाचा, बंधुत्वाचा विचार दिलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा, तसेच भारत जोडो यात्रेचा हाच संदेश आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही नम्रपणे वाटचाल करत आहोत..

महाराष्ट्रातील जनतेने या यात्रेला प्रचंड प्रतिसाद आणि भरभरून प्रेम दिले. आमच्यासोबत बरोबरीने चालले, लाखोंच्या संख्येने नांदेड आणि शेगाव येथील सभेमध्ये सहभागी झाले. या सर्व अबालवृद्ध, युवक, महिला यांच्या प्रेमाने आमचे हृदय, मन भरून आले आहे.

महाराष्ट्रात आम्हाला भारतातील समृद्ध विविधतेचे दर्शन झाले. या यात्रेदरम्यान, आम्हाला अनेक ऐतिहासिक मंदिरांना गुरुद्वारांना भेटी देता आल्या. तसेच विठ्ठलाचे पाईक वारकरी, बौद्ध भिक्कू आणि सुफी संप्रदायातील लोक यांच्यासोबत चालताना मनस्वी आनंद झाला. आम्ही भगवान बिरसा मुंडा यांची १५७ वी जयंती देशातील इतर आदिवासी बांधवांप्रमाणे साजरी केली. प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी महिला शक्तींना घेऊन (शक्तीमार्च) महिला सन्मानाचा संदेश दिला तसेच या प्रसंगी हजारो आदिवासी महिलांशी संवाद साधता आला व १० हजार महिलांच्या मेळाव्याला संबोधित केले, हे आम्ही आमचे भाग्य समजतो.

Best Places to Visit in Winter in India

संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही अशा लोकांचे ऐकले जे कठोर परिश्रम करतात; परंतु त्यांच्या तपस्यांचे फळ त्यांना मिळत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे गंभीर झालेले प्रश्न, त्याची कारणमिमांसा करता असे लक्षात आले की, कृषी साहित्याच्या किंमतीत झालेली प्रचंड भाववाढ, शेतमालाच्या भावात असलेली अनियमितता आणि फसलेली पीकविमा योजना यांनी शेतकऱ्याला गरिबीच्या दुष्टचक्रात ढकलेले आहे, हे पाहून मन व्यथित झाले. अनेक बेरोजगार युवक उच्च शिक्षण घेऊनही काम नसल्याने हतोत्साहीत झालेले, आपल्या स्वप्नाचा चुराडा झालेले पाहिले. आदिवासी समुदाय हा या देशाचा मुलनिवासी आहे आणि त्याच्या अधिकारावर गदा आलेली आहे. वन हक्क जमीन २००६ चा कायदा कशा पद्धतीने पायदळी तुटवला जात आहे हे सुद्धा लक्षात आले. या सगळ्या समस्यांची कारणमिमांसा करताना असे लक्षात आले की, भाजपाचे काही लोकांच्या हातामध्ये सत्ता आणि संपत्ती सिमित ठेवण्याचे धोरण याला कारणीभूत आहे. एका समुदायाला दुसऱ्या समुदायाच्या विरोधात संस्कृती, धर्म, जात आणि भाषा याचा वापर करून उभे करून संघर्ष उभा करण्याच्या भाजपच्या नितीमुळे परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे.

महाराष्ट्राचा पुरोगामी विचार हा नेहमी शाहू, फुले, आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज हा राहिलेला आहे. हा जाज्वल्य विचार देशाला नेहमी दिशा देत राहिला आहे. हा विचार टिकवण्याचा प्रयत्न अनेक नागरी समुदाय, पुरोगामी विचारांचे कलाकार, साहित्यिक, सिने क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र हे करत आहेत आणि त्यांनी आम्हाला जो पाठिंबा दिला आहे त्यासाठी मी त्यांचा कायम ऋणी राहिन. या प्रवासात वृत्तवाहिन्या व प्रिंट माध्यमातील माध्यम कर्मीच्या सहभागाकरीता मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो.

आम्ही अतिशय विनम्रतापूर्वक छत्रपती शिवाजी महाराज यांची पवित्र भूमी महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जात असताना संतांच्या या पुरोगामी मातीचा गंध, विचार संपूर्ण देशात घेऊन, जाऊ असा विश्वास महाराष्ट्रातील जनतेला देत आहोत. आपण दिलेले प्रेम, प्रचंड मोठा असा प्रतिसाद आणि आपण केलेले आदरातिथ्य याने आम्हाला एक नवीन ऊर्जा दिली आहे.

धन्यवाद !

खा. राहुल गांधी.

Top 100 New Year Wishes 2023

Tags: Congress Bharat Jodo YatraletterMaharshtrarahul gandhi
Previous Post

Sensex Opening Bell: सेन्सेक्स 150 अंकांनी वर, निफ्टी 18,300 च्या आसपास, नाईका, वेदांता फोकसमध्ये

Next Post

अकोला हे देशात दळणवळाचे महत्वाचे केंद्र ठरेल- उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस ; अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वे सेवेमुळे उत्तरेकडील राज्ये अकोल्याशी जोडण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल

RelatedPosts

Featured

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना

June 2, 2023
Mahatma Jyotirao Phule
Featured

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जिल्ह्यातील 734 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित

June 1, 2023
विशेष लेखः- ‘शासन आपल्या दारी’ विविध दाखले, योजनांचे लाभ…एकाच ठिकाणी
Featured

विशेष लेख- शासन आपल्या दारी : योजनांची माहिती ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

June 1, 2023
शासकीय बालगृहातील बालकांचे आरोग्य तपासणी
Featured

शासकीय बालगृहातील बालकांचे आरोग्य तपासणी

June 1, 2023
HSC Result 2022 : बारावी परीक्षेचा निकाल 94.22 टक्के
Featured

Maharashtra Board SSC Result 2023 : प्रतीक्षा संपली, उद्या दहावीचा निकाल

June 1, 2023
Temperature-summer (1)
Featured

राज्यात ४ जूननंतरच पाऊस, तोपर्यंत उष्णतेची लाट पारा जाणार ४० ते ४२ अंशांवर

June 1, 2023
Next Post
Akola Railway

अकोला हे देशात दळणवळाचे महत्वाचे केंद्र ठरेल- उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस ; अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वे सेवेमुळे उत्तरेकडील राज्ये अकोल्याशी जोडण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल

Nima Arora

‘महारेशीम अभियान 2023’च्या रथास जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

एकनाथ शिंदे

राज्यातील महिलांसाठी ‘महिला केंद्रीत पर्यटन धोरण’ राबवणार- राज्य मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

May 30, 2023
Temperature-summer (1)

राज्यात ४ जूननंतरच पाऊस, तोपर्यंत उष्णतेची लाट पारा जाणार ४० ते ४२ अंशांवर

June 1, 2023
विशेष लेखः- ‘शासन आपल्या दारी’ विविध दाखले, योजनांचे लाभ…एकाच ठिकाणी

विशेष लेख- शासन आपल्या दारी : योजनांची माहिती ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

June 1, 2023
Weather Forecast

अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांनी आणला पाऊस

May 30, 2023
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks