अकोला,दि.२1:- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन येथे शनिवारी (दि.१९) गटस्तरावर लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय एकात्मतेची सामूहिक शपथ घेण्यात आली.
या गटस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत अकोला गटातील ११ लोकनृत्यसंघांनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यात ललित कला भवन भीम नगर अकोला, केंद्र मलकापूर अकोला, केंद्र उमरी अकोला, केंद्र शिवनी अकोला, केंद्र मेहकर केंद्र कारंजा, केंद्र रिसोड, केंद्र वाशिम, केंद्र बुलढाणा, केंद्र मंगरूळपीर, केंद्र पारस यांचा समावेश होता.
यास्पर्धेत प्रथम क्रमांक :कामगार कल्याण केंद्र मेहकर (कालबेलिया नृत्य),द्वितीय क्रमांक :कल्याण केंद्र कारंजा लाड (गोंधळ नृत्य), तृतीय क्रमांक: कामगार कल्याण केंद्र वाशिम (बंजारा लोकनृत्य), उत्तेजनार्थ प्रथम :कामगार कल्याण केंद्र मंगरूळपीर (जागर नृत्य), उत्तेजनार्थ द्वितीय: कामगार कल्याण केंद्र रिसोड (गरबा नृत्य).
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शोभना ठाकरे, तनुश्री अमित भालेराव, हिमांशू विश्वकर्मा यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरण समारंभास जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, तर प्रमुख पाहुणे संगित तज्ज्ञ चंदाताई जयस्वाल, गुणवंत कामगार उमाकांत कवडे, प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त वैशाली नवघरे,कल्याण निरीक्षक भास्कर भेले आदी उपस्थित होते. विजयी संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अतुल महाले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख अजय पोरे, कैलास बच्चे, प्रेम कांत राऊत, देवानंद दाभाडे, मुकुंद देशमुख, प्रमोद घोडचर, नंदकिशोर खत्री, मनिष सरदार, विजय नेहुल, राजेश ठाकरे, जिजाबाई वराळे, राणी चौरे, नितीन मुळे दत्ता नळकांडे, सुभाष लहाने यांनी परिश्रम घेतले.