अकोला,दि.१८ :- जिल्ह्यात पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी जनजागृती करणे, अंमलबजावणी करणे व दंडात्मक कारवाई करण्यासाठी अनंतनंदाई सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था अकोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा पर्यावरण समितीच्या अध्यक्ष निमा अरोरा यांनी निर्गमीत केले आहेत.
तसेच जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी तथा जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य सचिव, पशू संवर्धन विभागाचे उपायुक्त हे या कारवाईबाबत साप्ताहिक अहवाल सादर करतील. यात संबंधीत क्षेत्रातील तहसिलदार,उपविभागीय अधिकारी,पोलीस निरीक्षकांनी पर्यावरण समितीच्या प्रतिनिधींना सहकार्य करावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.