• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 4, 2023
36 °c
Akola
36 ° Mon
37 ° Tue
37 ° Wed
36 ° Thu
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Rahul Gandhi : सावरकरांबद्दलच्या वक्तव्याने वाद, राहुल गांधींविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल

Our Media by Our Media
November 18, 2022
in Featured, ठळक बातम्या, फिचर्ड, राजकारण, राज्य, संपादकीय
Reading Time: 1 min read
115 3
0
Rahul Gandhi
17
SHARES
840
VIEWS
FBWhatsappTelegram

ठाणे :- काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केले असून त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याविरोधात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख वंदना डोंगरे यांनी ठाणे नगर पोलीस स्थानकात राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमच्या महापुरुषांची बदनामी सहन करणार नाही असा पवित्रा वंदना डोंगरे यांनी घेतला असून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने देखील यासाठी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. पोलिसांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनीही काल मोर्चा दरम्यान केली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस नक्की काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.

हेही वाचा

डोकेदुखीकडे नका करू दुर्लक्ष, मायग्रेनचा त्रास तर नाही ना? जाणून घ्या कारणे आणि उपाय

महाराष्ट्र सरकार-बजाज फिनसर्व्हमध्ये करार पुण्यात ५ हजार कोटींची गुंतवणूक, ४० हजार नोकऱ्यांची संधी

या प्रकरणी ठाणे नगर पोलीस स्थानकात आयपीसीच्या ५०० आणि ५०१ कलमान्वये अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य सावरकरांची बदनामी करणारे आणि लोकांच्या भावना दुखावणारे असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

सर, मी आपला सेवक राहू इच्छितो, असे माफीपत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांना लिहिले होते. तसेच महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनाही त्यांनी पत्रावर सही करायला सांगितले होते, असे स्पष्ट करून सावरकरांनी देशाचा तसेच तत्कालीन काँग्रेस नेत्यांचा विश्वासघात केला, अशी टीका काँग्रेस नेते, खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुरुवारी वाडेगाव (अकोला) येथे केली होती.

सावरकरांच्या या कृतीबद्दलचा इत्थंभूत तपशील माझ्याकडे आहे. राज्यात यावरून काही लोक यात्रा रोखायची भाषा करत आहेत. मात्र, सरकारला वाटत असेल; तर यात्रा रोखून दाखवावी, असे आव्हानही राहुल गांधी यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले होते.

सावरकरांनी लिहिलेल्या माफीनाम्याची प्रत राहुल गांधी यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींना दाखवली. हे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना दाखवण्याचे आवाहनही त्यांनी माध्यमांना केले होते.

सत्ताधार्‍यांचा न्याय, तपास यंत्रणांवर दबाव!

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गुरुवारी पातूर येथून वाडेगावात दाखल झाली. त्यानंतर राहुल यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, सत्ताधारी पक्षांकडून केवळ तपास यंत्रणाच नव्हे; तर न्यायव्यवस्थेवरही दबाव आणला जात आहे. याशिवाय देशात सर्वसामान्यांनाही गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरुणांना नोकरी मिळण्याची शाश्वती राहिली नाही. शिक्षणासाठी मोठा पैसा खर्च करावा लागत आहे. गोरगरीब चांगल्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत. आरोग्य सुविधेसाठी खर्च करावा लागत असल्याने सामान्य हवालदिल झाले आहेत. सरकारी शाळा, सरकारी दवाखाने सुसज्ज करण्याऐवजी खासगीकरणाला चालना दिली जात आहे. सर्व पैसा उद्योगपतींकडे कसा जाईल, यावरच सरकारचे जास्त लक्ष आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.

20 Places To Visit In Nagpur In 2022!

 

Tags: congressrahul gandhi
Previous Post

हींदुह्रुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतीथी बाळा साहेबांची शिवसेना तेल्हारा तालुक्याच्या वतीने संपन्न

Next Post

पर्यावरण संरक्षण संवर्धन जनजागृती व कारवाईसाठी संस्था नियुक्त

RelatedPosts

डोकेदुखीची समस्या, जाणून घ्या काय आहेत कारणे?
Featured

डोकेदुखीकडे नका करू दुर्लक्ष, मायग्रेनचा त्रास तर नाही ना? जाणून घ्या कारणे आणि उपाय

June 3, 2023
देवेंद्र फडणवीस
Featured

महाराष्ट्र सरकार-बजाज फिनसर्व्हमध्ये करार पुण्यात ५ हजार कोटींची गुंतवणूक, ४० हजार नोकऱ्यांची संधी

June 3, 2023
Featured

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना

June 2, 2023
Mahatma Jyotirao Phule
Featured

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जिल्ह्यातील 734 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित

June 1, 2023
विशेष लेखः- ‘शासन आपल्या दारी’ विविध दाखले, योजनांचे लाभ…एकाच ठिकाणी
Featured

विशेष लेख- शासन आपल्या दारी : योजनांची माहिती ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

June 1, 2023
शासकीय बालगृहातील बालकांचे आरोग्य तपासणी
Featured

शासकीय बालगृहातील बालकांचे आरोग्य तपासणी

June 1, 2023
Next Post
nima arora

पर्यावरण संरक्षण संवर्धन जनजागृती व कारवाईसाठी संस्था नियुक्त

akola

विषारी पदार्थ सेवनातून श्वान मृत्यूच्या घटना उपचारासाठी प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीचा पुढाकार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

ट्रकची प्रवासी ऑटोला धडक चार प्रवासी जखमी,आ.नितीन देशमुख मदतीला

ट्रकची प्रवासी ऑटोला धडक चार प्रवासी जखमी,आ.नितीन देशमुख मदतीला

May 31, 2023
Temperature-summer (1)

राज्यात ४ जूननंतरच पाऊस, तोपर्यंत उष्णतेची लाट पारा जाणार ४० ते ४२ अंशांवर

June 1, 2023
राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त ग्रा पं वाडी अदमपूर तर्फे महिलांचा सन्मान

राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त ग्रा पं वाडी अदमपूर तर्फे महिलांचा सन्मान

May 31, 2023
Mahatma Jyotirao Phule

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जिल्ह्यातील 734 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित

June 1, 2023
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks