अकोला,दि.16:- कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली अंर्तगत चालणाऱ्या जन शिक्षण संस्थान, अकोला येथे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती व ‘जनजाती गौरव दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बिरसा मुंडा यांच्या जीवन चरीत्र, शिक्षण क्षेत्रातील व स्वातंत्र्यपुर्वी केलेल्या चळवळीतील योगदानाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंन्द्राचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय ठाकरे, प्राचार्य प्रशांत गुल्हाने, गुरूनानक विद्यालयाचे मिरा आहुजा आदि उपस्थित होते.
स्त्री जिवन समृध्द होण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक स्त्रीने घेतला पाहिजे. महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहु नये याकरीता महिलांनी आपल्यातील कला गुणांणा वाव देऊन कौशल्य विकास करावा. स्त्रीयांची आर्थिक उन्नती व्हावी याकरीता महिलांनी व्यवसाय प्रशिक्षण घेवून स्वत:चा व्यवसाय करावा, असे मिरा आहूजा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. प्रशिक्षणार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असल्यास स्वत:मध्ये शंभर टक्के कौशल्य आत्मसात करावा, असे जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंन्द्राचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय ठाकरे यानी मार्गदर्शन करताना सांगितले. जन शिक्षण संस्थाचे राहूल मरोडकर यांनी व्यक्तीमधील कौशल्य विकास, उदरनिर्वाह व त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी जन शिक्षण संस्था कार्यरत असल्याचे माहिती दिली.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवन संघर्ष, स्वातंत्र्यपुर्वी केलेल्या चळवळ व शिक्षण क्षेत्रातील योगदान या विषयावर ब्युटी पार्लरच्या प्रशिक्षणार्थी अमिशा मिश्रा, अपेक्षा जाधव, असमा खान, अमिना खान, सानीया फातोडे व शाहीस्ता परवीन यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अमीशा मिश्रा यांनी तर आभार प्रदर्शन राहूल मरोडकर यांनी केले.