• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मेटा, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट नंतर आता Amazon ने ३,७०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ? जाणून घ्या, कर्मचारी कपाती मागचं कारण

Our Media by Our Media
November 11, 2022
in Featured, ठळक बातम्या, नोकरी, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
120 1
0
Amazon
54
SHARES
867
VIEWS
FBWhatsappTelegram

मेटा, ट्विटर आणि मायक्रोसॉफ्ट नंतर आता ॲमेझॉनने (Amazon) कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकन तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्स क्षेत्रात दिग्गज असलेल्या अ‍ॅमेझॉनने वाढत्या आर्थिक मंदीच्या पार्श्‍वभूमीवर नॉन- प्रॉफिटेबल उपक्रमांची व्याप्ती कमी केली आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पाठवलेल्या एका मेमोनुसार कंपनीने गेल्या आठवड्यात नवी नोकरभरती गोठवली. ॲमेझॉनमध्ये काम करणार्‍या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने लिंक्डइनवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने कंपनीतून काढून टाकण्यात आल्याचे उघड केले आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त Business Today ने दिले आहे.

त्याचबरोबर एका माजी कर्मचाऱ्याने केलेल्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की संपूर्ण रोबोटिक्स टीमच्या हातात नारळ दिला आहेत. LinkedIn च्या डेटानुसार, कंपनीच्या रोबोटिक्स विभागामध्ये किमान ३,७६६ कर्मचारी काम करतात. पण यातील नेमक्या किती कर्मचार्‍यांना काढून टाकण्यात आले आहे याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की कंपनीने तोट्यात असलेल्या युनिट्समध्ये काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना इतरत्र नोकरी शोधण्याची सूचना केली आहे. कारण ते ज्या प्रकल्पात काम करत आहेत ते लवकरच बंद होऊ शकतात किंवा निलंबित केले जाऊ शकतात. गेल्या आठवड्यात ॲमेझॉनने (Amazon) कंपनीच्या इंटर्नल मेमोमध्ये म्हटले होते की कमजोर आर्थिक वातावरणामुळे कंपनी नवी नोकरभरती थांबवणार आहे.

दरम्यान, फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटाने जगभरातील ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये ही माहिती दिली आहे. मायक्रोसॉफ्ट, ट्विटर, मेटा आणि आता ॲमेझॉनने कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्राताला मोठा धक्का बसला आहे.

कर्मचारी कपातीचे ‘हे’ आहे प्रमुख कारण

खरं तर, जगभरातील टेक कंपन्या आर्थिक मंदीमुळे घाबरल्या आहेत. प्रथम कोरोना लॉकडाऊन आणि आता रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत वाढत्या अनिश्चिततेमुळे टेक कंपन्यांनी नोकरभरती थांबवली आहे आणि मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. यामागचे कारण असेही सांगितले जात आहे की, रशिया-युक्रेन युद्धामुळे पुरवठा साखळीत अडचण येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे चीनमध्ये लॉकडाऊन आहे. सध्या पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे आणि त्यामुळे टेक कंपन्यांच्या अडचणी वाढत आहेत.

Tags: AmazonemployeesMetaTwitterWipro
Previous Post

पक्षी सप्ताहानिमित्तः विशेष लेख: अकोल्याचे पक्षी वैभव

Next Post

खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
nima arora

खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल

पक्षी

चला निर्माण करूया, आपल्या अंगणात पक्षी अभयारण्य

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.