अकोला,दि.7:- वनविभागाच्या वतीने शनिवार दि.५ ते शनिवार दि.१२ पर्यंत पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त अकोला वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वन्यजीव विभाग यांनी मिळून विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या पक्षी सप्ताहाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली. त्यात वनविभागाचे अधिकारी- कर्मचारी यांच्यासह पर्यावरण प्रेमी नागरिकांनीही सहभाग घेतला. शहरात उपवन संरक्षक कार्यालय, अशोक वाटिका- अकोला बस स्टँड – टॉवर चौक – रतनलाल प्लॉट चौक – आकाशवाणी चौक – अशोक वाटिका अशी प्रभात फेरी काढली.
यामध्ये अकोला वन, वन्यजीव व सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी कर्मचारी, निसर्गप्रेमी अशासकीय संस्था, पक्षी मित्र व नागरिकांचा समावेश होता.या प्रभात फेरीच्या माध्यमातून पक्षांचे जैव विविधतेत महत्त्व ,संरक्षण व संवर्धन बाबत माहिती देवून जन जागृती करण्यात आली.या प्रभात फेरीस उपवन संरक्षक अर्जुना के.आर. यांनी हिरवी झेंडी दिली.या कार्यक्रमास दीपक जोशी, उदय वझे, बाळ काळने, अमोल सावंत, संदीप सरडे, डॉ. आशुतोष डाबरे व इतर निसर्ग प्रेमी नागरिकांचे सहकार्य लाभले.