अकोला, दि. 2 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत दि. 31 ऑक्टोंबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान कायदेविषयक जनजागृती पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे. या पंधरवाडाची सुरुवात सोमवारी(दि.31) गायत्री बालिकाश्रम, अकोला येथे जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एस.के. केवले यांच्या हस्ते झाली.
समाजामध्ये नागरीकांचे कायदेविषयक जनजागृती व्हावी याकरीता पंधरवाडा कालावधीत राबविण्यात येणारे उपक्रमाविषयी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी दिली. तसेच राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ॲड. संजय सेंगर यांनी बालकांचे हक्क व अधिकार याबाबत प्रवेशितांसोबत हितगुज केले. चाईल्ड लाईनच्या समन्वयक हर्षाली गजभिये यांनी गुड टच बॅड टच व 1098 या बाबत माहिती दिली. पॅनल ॲडव्होकेट ॲड सुमेध डोंगरदिवे यांनी प्रवेशितांना शिक्षणाचे महत्व व त्यामुळे होणारे बदल याबाबत माहिती दिली. बालकल्याण समितीचे सदस्य राजेश देशमुख, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर, चाईल्ड लाईनचे विद्या उंबरकर, विधी सेवक मोहन तायडे, शहाबाज खान, गायत्री बालिकाश्रमाच्या भाग्यश्री घाटे, सोनल रायपुरे व प्रवेशित बालिका उपस्थित होत्या.