तेल्हारा :- आज तेल्हारा बस आगार येथे काँग्रेस शहर अध्यक्ष ॲड पवन शर्मा, व तालुका काँग्रेस अध्यक्ष अफरोज पठाण यांनी तेल्हारा तालुक्यातील व शहरातील नागरिकांची जुन्या बसेस मुळे होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन डेपो व्यवस्थापक यांना निवेदन देऊन तात्काळ नवीन बसेस ची मागणी केली आहे.
त्याचप्रमाणे बस आगार व परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सी. सी टी. वी कॅमेरा लावण्यात यावा असे निवेदन देण्यात आले यावेळी ऍड पवन शर्मा, अफरोज पठाण, मंगेश (सोनू सर) मालिये ,प्रशांत देशमुख, अतुल ढोले, आशुतोष बलोदे ,अनंत सोनमाळे, संदीप देशमुख, संदीप खारोडे, युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन पोहरकर, मंगेश दुतोंडे, शुभम सोनोने, सहील कुरेशी, नितीन पिंपळकार, अक्रम शेख, अब्बु भाई कुरेशी, फिरोझ खान, अन्सार पटेल, शेख अहमद, रजियाताई पटेल, उपस्थित होते.