अकोला, दि.2 :- येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. तसेच भ्रष्टाचार जनजागृती सप्ताहाचा प्रारंभही करण्यात आला. प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार, सचिन सावंत गटनिदेशक कौशलाचार्य मंगेश फुंडकर,वाघमारे, काळे आदी उपस्थित होते.
प्रत्यक्ष भ्रष्टाचाराची व्याप्ती आणि त्याचे समाजावर होणारे दूरगामी परिणाम याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. लाचलुचपत विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांक वर माहिती द्यावी असे आवाहन नरेंद्र खैरनार यांनी केले. सूत्रसंचालन शंतनु वानखेडे आणि संदीप पिसे यांनी केले. आयोजनाकरिता गटनिदेशक विवेक काळे,मगर, पी एम पाटील यांनी परिश्रम घेतले.