तेल्हारा- दि 25 सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिवस, फार्मासिस्ट हा कायमच समाजाचा हिरो राहिलेला आहे , 24 तास अविरत सेवा देणारा. आरोग्यसोबतच सामाजिक बांधिलकी जपणारा असतो. केमिस्ट , ड्गिस्ट असोसिएशन तेल्हारा, ता. च्या वतीने सर्वपित्री अमावस्ये चे औचित्य साधून श्रीनाथ वृद्धाश्रम, दाहिगाव येथे “सर्वपित्री अमावस्या व वृद्धाश्रम एक विचार” हा कार्यक्रमा सदरम्म्यान सर्व फार्मासिस्ट नी तेथील वृद्ध माता पित्याची प्रेमाने चौकशी केली त्याच्या व्यथा जाणून घेतल्या, त्यांच्या आरोग्याबाबतच्या समस्या जाणून त्यांना आवश्यक ती मेडिसिन वाटप केले.
तेथील वृद्धांनी त्यांना आपल्या आरोग्यविषयक समस्या सांगून अगदी स्वतःच्या मुलाप्रमाने हक्काने नियमित लागणाऱ्या औषधी सांगितल्या आणि त्या सामाजिक योध्यानी कायमच त्यांना औषधी पुरवू म्हणून हमी दिली आणि आजच्या दिवशी त्यांच्याकडून प्रेमपूर्वक आशीर्वाद मिळवले, त्यांना अगदी स्वतःच्या आई वाडीलांप्रमाणे मानून त्यांना फळे व अल्पोहार देऊन स्वतःही त्यांच्यासमवेत आलपोहर घेऊन परकेपणा दूर केला, तसेच आता दिवाळी जवल येत आहे. आणि दिवाळी म्हणजे थंडीचा महिना , थंडीपासून बचाव करण्यास त्यांना ब्लॅंकेट भेट म्हणून दिले. या प्रसंगी तेल्हारा केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन तालुका अध्यक्ष मा. हरिषजी टावरी, ता. सचिव दिपक पुंडकर, शहर अध्यक्ष. मीतेश मल्ल, शहर सचिव सुनील भैया, ए सी मेम्बर दिपक मार्के इतर सभासद, विकी पलीवाल, अनिकेत फोकमरे, विशाल सोनोने, पवन कोकदे, धीरज राऊत व सर्व केमिस्ट बंधू उपसस्थित होते.