अकोला (सुनिल गाडगे) : पिंजर शाखेच्या समता परीषद आयोजित कार्यक्रमात राज्यात आपत्ती व्यवस्थापन गेल्या 23 वर्षापासुन निरंतरपणे सेवा देणारे जिवरक्षक दीपक सदाफळे यांचा चला हवा येऊ द्याचे सुप्रसिद्ध कलाकार अख्खा महाराष्ट्रा हसविणारे मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार काॅमेडी फेम मा.अंकुरजी वाढवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.आ. तुकारामभाऊ बिडकर यांच्या हस्ते सन्मान करुन गौरवण्यात आले. यावेळी सर्व प्रथम क्रांतिसुर्य महात्मा फुले व साविञी बाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन मा.श्री अंकुर वाढवे चित्रपट अभिनेता मुंबई (चला हवा येऊ द्या फेम) यांचा समता परीषदच्या वतीने विषेशतः भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कार मुर्ती किशेर बळी सर, सुरेश राऊत सर,तन्मय जऊळकर,यांचा सत्कार समारंभ पार पडला, यावेळी महात्मा फुले समता परिषद चे उपाध्यक्ष मा.आ. प्रा.तुकारामभाऊ बिडकर यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले यावेळी अकोला जिल्हा समता परिषद चे अध्यक्ष प्रा. सदाशिव शेळके, व शञुघ्न बिडकर, पिंजरचे सरपंच अशोकराव लोणाग्रे, जि.प सदस्या अनुसयाबाई राऊत,पं.स.जावेदभाई, रा.काॅ.पा.ता.अ.सतीश पाटील गावंडे,रा. काॅ.पा.चे पिंजर येथील जेष्ट नेते सुधिरबाप्पु देशमुख, नयन कुमार जयस्वाल, मा.ता.शिवसेना प्र. बंडुभाऊ राऊत, मा.ग्रा.पं.स.प्रविणभाऊ जयस्वाल, प्रेम पाटील लहाने,तावरे गुरुजी, पांडुरंग कठाळे, ग्रा.पं.स. पांडुरंगभाऊ ठक,दिलीप बाप्पु देशमुख,पत्रकार योगेशभाऊ विभुते,आणी पिंजर गावातील तसेच वडगाव येथील मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महात्मा फुले समता परिषद पिंजर शाखाप्रमुख मुकेश इंगळे, धनराज जवके, बाळु काळे, सुधाकर निलखन, श्रीराम पोपळे, महेश घनगाव, समता परिषद पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले. अशी माहिती समता परीषद पिंजर चे धनराज जवके यांनी दीली.