रिधोरा (पंकज इंगळे)- बाळापूर तालुक्यातील ग्राम रिधोरा येथे दिनांक,16.09.22 शुक्रवार रोजी आयडीएफसी फर्स्ट भारतने ग्राम रिधोरा येथे ग्रामपंचायत कार्यालय येथील सर्व लोकांना नेत्रदानाचे महत्त्व सांगून भव्य नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी, अल्प दरामध्ये चष्मे उपलब्ध आणि मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत मध्ये अशी सुविधा देण्यात आली. नेत्र तपासणी शिबिरासाठी रिधोरा या ग्रामीण भागातील लहान-मोठे स्त्री-पुरुष यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
या शिबिरासाठी (सी एस आर रिजनल मॅनेजर महाराष्ट्र आयडीएफसी फर्स्ट भारत) श्री शरद देविदास देडे, (शाखाधिकारी आयडीएफसी फर्स्ट भारत अकोला) श्री ज्ञानेश्वर राऊत, तसेच शाखेतील सर्व कर्मचारी या नेत्र तपासणी शिबिरासाठी उपस्थित होते. या नेत्र तपासणी शिबिरासाठी डॉक्टर विठ्ठल नारायणकर, आणि त्यांचे सहाय्यक सोनाली गायकवाड, आणि सानिका देडे यांनी या नेत्र तपासणी शिबिरामधील जनतेची तपासणी पूर्ण केली.
आयडीएफसी फर्स्ट भारत ही सामाजिक बांधिलकी जपून वेगवेगळ्या प्रकारचे आणि लोकांच्या हिताचे उपक्रम नेहमी राबवत असते. या उपक्रमासाठी रीधोरा गावातील लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.