अकोला,दि. 8 : राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. येथील लोकशाही सभागृहात राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, तहसीलदार शिल्पा बोबडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.