अकोला दि.18: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य सप्ताहाअंतर्गत स्व. वसंत देसाई स्टेडियम येथे आज सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगान व गिटार वादकांव्दारे राष्ट्रगीत उत्साहात गायन करण्यात आला.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी, जिल्हा क्रीडा कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी,सहकारी विद्यालय बुलडाणा, श्री साई विद्यालय लोहारा, श्री समर्थ पब्लिक स्कुल रिधारा, स्कुल ऑफ स्कॉलर्स, अकोलाचे हॉकी खेडाळू व प्रशिक्षक उपस्थित होते. तसेच स्विमिंग पुल मास्टर पॉवर कर्मचारी, क्रीडा प्रबोधिनी, जिल्हा खो-खो प्रशिक्षण केंद्र, जिल्हा कबड्डी प्रशिक्षण केंद्र, युवा फिजीक ॲकेडमी, जिल्हा क्रीडा बॅडमिंटन, अजिंक्य फिटनेस पार्क, अव्दैत गिटार ॲकेडमीचे प्रशिक्षणार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.