पातूर (सुनिल गाडगे) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात उत्सहात साजरा होत आहे. या पर्वावर पातुरच्या स्मशानभूमीत झेंडावन करून हा उत्सव साजरा करण्यात आला. अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने हा अभिनव महोत्सव घेऊन आपल्या राष्ट्रभक्तीचा परिचय दिला आहे. स्मशानभूमीत झेंडावंदन करण्याचा कदाचित हा देशातील पहिलाच उपक्रम ठरला आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पातूर येथील अभ्युदय फाउंडेशन ही सेवाभावी संस्था स्मशानभूमी येथे सेवा देण्याचे काम अविरतपणे करीत आहे. येथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना विविध सेवा देण्यासाठी ही सेवाभावी संस्था काम करीत आहे. या ठिकाणी अंत्यविधी करिता सेवा देणारे कुटुंब या संस्थेच्या माध्यमातून सेवा देत आहे. स्मशानभूमी हे जीवनाचे अंतिम स्थळ आहे. अशा पवित्र स्थळी सुद्धा देशभक्ती चा जागर व्हावा, या उद्देशाने अभ्युदय फाउंडेशनने 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवसाजरा करण्याचे प्रशासनाचे आवाहन आहे त्यानिमित्त झेंडावंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून हा अभिनव देशभक्तीचा महोत्सव पातुरच्या स्मशानभूमीत पार पडला. यावेळी अभ्युदय फाउंडेशन चे सचिव बंटी गहिलोत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित सभासदांनी झेंड्याला मानवंदना दिली. यावेळी अभ्युदय फाउंडेशन चे डॉ संजयसिंह परिहार, प्रशांत बंड, प्रविण निलखन, दिलीप निमकंडे, शुभम पोहरे, तसेच चंद्रमणी धाडसे, अक्षय गाडगे, हनुमंत कोंडेवर व त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. राष्ट्रगीत आणि वंदे मातरम च्या घोषणा देत कार्यक्रमाची सांगता झाली.