तेल्हारा :- दिनांक १३/०८/२०२२ शनिवार रोजी जि प उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळा नर्सिपूर येथे भारतीय स्वतंत्रतेचा अमृत महोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला.
ह्या प्रसंगी शालेय इमारतीवर मुख्याध्यापक श्री. रहीम खान सर यांचे हस्ते तिरंगा ध्वज फळकविण्यात आला . सदर कार्यक्रमात गावतील पदाधिकारी म्हणून श्री. सैफुल्लाह खान (मां.जि प सदस्य), श्री गब्बर जमदार (तं.मु.अध्यक्ष नर्सिपूर), श्री शेख मुराद (शा.व्य.स.अध्यक्ष), श्री शेख महेमूद (ग्रा.प.सदस्य), श्री ऐनुल्लाह खान (तं.मु.अध्यक्ष मुकर्दम), सादिक भाई (मा.सरपंच),कलीम मौलाना,जमदार साहब व इतर मान्यवर हजर होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.