तेल्हारा (प्रतिनिधी)- डाॅ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवाअंतर्गत भव्य तिरंगा रॅली, पोस्टर प्रदर्शनी, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे सर्व कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रिय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॅ. जी.ओ.जोंधळेकर, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. सुषमा फरसोले, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक एम पी चोपडे, डॉ कृष्णा माहुरे, प्रा एम एम कवरके, प्रा. डाॅ. धीरज नजान, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक सतिश तुरे, प्रा.योगेश कोरपे, प्रा. प्रशांत गेबड, प्रा.सुरेश झामरे, प्रा. वघ॔ट, प्रा. बोकारे, प्रा. मिसाळ, प्रा.चक्रे, प्रा.सोनोने, प्रा. मेटांगे व शिक्षकेतर कम॔चारी अमोल गेबड, मंगेश देवतळे, सचिन ढोले, राजेंद्र सोनोने, शैलेश फोकमारे, अभिजीत लोखंडे, हिंमत फोकमारे, रा.से.यो.चे सर्व स्वयंसेवक व विद्यार्थ्यी यांच्यासह माजी सैनिक संघटना, पोलीस दल, नागरिक, बहुसंख्य विद्यार्थ्यांसह तेल्हारा शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य जनजागृती फेरी काढण्यात आली. या प्रसंगी घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात आला.
राष्ट्रिय सेवा योजनेव्दारे महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले व वृक्षारोपण करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतग॔त निबंध स्पर्धेचे आयोजन व पोस्टर प्रदश॔नी स्पर्धा आयोजित करण्यात आली. वरिष्ठ महाविद्यालयाव्दारे प्रा. एम.पी.चोपडे यांनी निबंध स्पर्धा आयोजीत केली. निबंध स्पर्धेचा विषय भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महापुरूषांचे योगदान हा होता. त्यामध्ये प्रथम क्रमांक कु. दुर्गा विनोद लाहोडे, व्दितिय क्रमांक रोशन किसन वानखडे व तृतीय क्रमांक कु.भक्ती गजानन वासनकर हिचा आला. पोस्टर प्रदश॔नी स्पर्धा प्रा.डाॅ.धीरज नजान यांच्या व्दारे आयोजित करण्यात आली यामध्ये प्रथम क्रमांक रोशन किसन वानखडे याने मिळविला. विजेत्या स्पध॔कांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या सव॔ कार्यक्रमांचे आयोजन प्राचार्य डॉ. गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.