घोडेगाव (प्रा विकास दामोदर)- घोडेगाव येथील के. एम. अजहर हुसेन विद्यालयाद्वारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ग्रामीण भागातील प्रत्येक माणसाच्या मनात देशभक्ती विषयी जाणीव निर्माण करण्यासाठी व हर घर तिरंगा अभियानात प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आहे. सदर रॅलीत वर्ग ८ते १२वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, संपूर्ण गावातून स्वातंत्र्य दिन चिरायू होवो, भारत माता की जय, अशा घोषणांनी परिसर दणालेला होता.
जनजागृती रॅलीचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक मजीद खान हमीद खान यांच्या मार्गदर्शनात अ. मजीद अ. अजीज, डॉ. अतिक अहेमद, सौ. नसीम बानो, नासिर बेग, युसूफ खान, तौसिफ़ खान ई. शिक्षक वृंदानी यशस्वी रित्या पार पाडला.