अकोला- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चे निमित्ताने पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमात चे आयोजन करण्यात येत आहे.
आज दिनांक १२/०८/२०२२ रोजी पोलीस मुख्यालय तर्फे भव्य शस्त्र प्रदर्शनीचे आयोजन निमवाडी पोलीस वसाहत येथील हॉल मध्ये सकळी ०९ ते १२ चे दरम्यान शालेय विद्यार्थ्यांन करीता करण्यात आले होते. या प्रदर्शनीला जसनागरा पब्लिक स्कूल रिधोरा या शाळेतील मुलांनी सहभाग घेतला होता, पोलीस विभागात वापरले जाणारे शस्त्र व त्याचा वापर कशाप्रकारे केला जातो, या बाबतीत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. मुलांनी कौतुकाने या शस्त्र प्रदर्शित सहभाग घेऊन नवीन महिती प्राप्त केली. यावेळी कवायत प्रशिक्षक सत्तार सर, शेषराव ठाकरे सर, कुंदन इंगळे सर, आसिफ सिध्दीक सर, उमेश सानप, राखीव पोलीस उपनिरीक्षक गोविंद साबळे, राखीव पोलीस निरीक्षक श्री श्रीधर गुलसुंदरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
क्रमाकरिता नितीन शिंदे प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृह पोलीस निरीक्षक 1 मोहाडे बिनतारी संदेश विभाग, प्राचार्या भारती दाभाडे मॅडम जसनागरा पब्लिक स्कूल रिधोरा (आय सी एस ई) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.