अकोला (सुनिल गाडगे) दि.११ : बाळापुर मतदार संघाचे दहा वर्षे प्रतिनिधित्व करणारे भारिप बहुजन महासंघाचे माजी आमदार यांनी अकोला पूर्वचे आमदार व जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात आज रोजी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा माजी ऊर्जामंत्री बावनकुळे आणि राज्यस्तरीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनात भेट घेतली.सविस्तर चर्चा करण्यात येवून, मतदारसंघाच्या रखडलेल्या विकासासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दि.२० ऑगस्ट रोजी अकोला येथे भाजपात प्रवेश करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. स्वच्छ व प्रामाणिक प्रतिमा असलेले नेतृत्व व सर्वसामान्य जनतेसोबत समरस असणारे व्यक्तिमत्त्व असलेल्या बळीराम सिरस्कार यांच्या भाजपा प्रवेशाच्या बातमीमुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी व बाळापूर तालुका तसेच मतदारसंघाला न्याय देण्याच्या भूमिकेमुळे माजी आमदार बळीराम भाजपा प्रवेश करण्याचे निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता बाळापुर मतदार संघाचे सर्व समीकरणे बदलणार असून येणाऱ्या काळात भाजपाला सिरस्कार यांच्या रुपाने बहुजन समाजाचे सामर्थ्यवान नेतृत्व लाभणार आहे.
अकोला जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष आ.रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी आमदार बळीराम सिरस्कार भाजपात प्रवेश करत असून पक्ष वाढीसाठी व संघटनात्मक दृष्टीने कार्य करण्याचे निश्चित केले आहे. बळीराम सिरस्कार यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा हादरा बसणार आहे. भाजपा पक्ष प्रवेशासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे जयंत मसणे, विजय अग्रवाल, सचिन कोकाटे, राजेश बेले, हिरासिंग राठोड व राजूभाऊ उगले या भाजपा कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. उमरी स्थित सावित्रीबाई ज्योती फुले विद्यालयाच्या प्रांगणात येत्या २० ऑगस्टला कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांसह बळीरामभाऊ प्रवेश करणार आहेत.