• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

एज्युविला पब्लिक स्कूल येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा

City Reporter by City Reporter
August 8, 2022
in Featured, अकोला, उत्सव, फिचर्ड, महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
92 1
0
एज्युविला पब्लिक स्कूल येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा

एज्युविला पब्लिक स्कूल येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा

14
SHARES
661
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनिल गाडगे)- एज्युविला पब्लिक स्कूल पातुर येथे पर्यावरण पूरक शाडू मातीचे गणपती देशी झाडांच्या बियांनी कलाकुसर करीत तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केल्या गेली.

आपल्या जीवनात आपण निसर्गास हानिकारक अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश कळत नकळत केला आहे ,त्यापैकी ज्या वस्तू आपण सहज पर्यायी मार्गाने बदलून पर्यावरण संवर्धनास मदत करतील अशा संकल्पनेचा अंगीकार केला पाहिजे. त्यातीलच एक संकल्पना म्हणजे पर्यावरण पूरक मातीचे गणपती…. दरवर्षी आपण गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती आणून स्थापना करून तिची मनोभावे पूजा करतो, परंतु विसर्जना वेळी ती मूर्ती पाण्यात विरघळत नाही आणि पाण्याचे स्त्रोत दूषित होतात याकरीता एक सकारात्मक पाऊल म्हणून एज्यूविला पब्लिक स्कूल पातुर येथे पर्यावरण पूरक गणेशा या संकल्पनेवरील कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला व मातीचे गणपती बनवून त्यात देशी झाडांच्या बियाचा सजावटीकरीता वापर करण्यात आला. जेव्हा मातीची मूर्ती विसर्जित होईल तेव्हा त्यातून झाडाचे रोपटे विसर्जन स्थळी उगवेल व गणेशोत्सव सोबतच वृक्षारोपण होईल. सदर कार्यशाळेचे आकर्षण म्हणजे अवघ्या सात वर्षाच्या पूर्वा बगळेकर हिने इको फ्रेंडली गणेशा कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. पूर्वा बगळेकर ही स्वतः बालकलावंत असून तिने गणेश मूर्ती कशी बनवायची त्याचे प्रात्यक्षिक अगदी सोप्या भाषेत सांगून सर्वांना अवाक केले व मुलांना माती, जल, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून सांगितले. या कार्यशाळेस पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय नाफडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले व येणाऱ्या गणेशोत्सवात पर्यावरण पूरक गणपती स्थापन करण्याचे आवाहण केले. उत्कृष्ट गणेश मूर्ती मधून प्रथम क्रमांक खुशी उगले व दर्शन उगले या दोघा भावंडांना, द्वितीय क्रमांक करण पवार तर तृतीय क्रमांक सारिका पोहरे या विद्यार्थ्यांनी पटकावला. कार्यक्रमाचे आयोजनाकरीता शाळेच्या मुख्याध्यापिका व विश्वस्त विद्या निलेश गाडगे यांनी पुढाकार घेतला तसेच सविता ठाकरे, प्रीती शेलुडकर, नीता ठाकरे, भाग्यश्री इंगळे,शितल फुलारी, जयश्री वानखडे,नम्रता बगाडे, पूजा इंगळे, सुवर्णा कुकडकर, स्नेहल इंगळे, विजया तायडे, कीर्ती बंड, सविता वानखडे, प्रतिमा अंधारे, सुषमा इनामदार, नूतन भालेराव, सुषमा पोरे, प्रवीण पाचपोर, आकाश गुलालकरी, आनंद वडतकर, नंदा धानोरकार, प्रभा दांडगे, रंजना बोरकर, ज्योती मुठाळ, विजय गाडगे, गणेश पाटील सय्यद शोएब व सय्यद साजिद यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Previous Post

बॅडमिंटन : लक्ष्य अंतिम फेरीत; साईराज-चिरागची जोडी जिंकली

Next Post

जलशक्ती मंत्रालयाचा उपक्रम; अमृत सरोवरांकाठी होणार ध्वजवंदन

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
जलशक्ती मंत्रालयाचा उपक्रम; अमृत सरोवरांकाठी होणार ध्वजवंदन

जलशक्ती मंत्रालयाचा उपक्रम; अमृत सरोवरांकाठी होणार ध्वजवंदन

रोजगार मेळावा

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा : ५०७ उमेदवारांचा सहभाग; १८४ जणांची प्राथमिक निवड

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.