बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्य सेनने सिंगापूरच्या जिया हेंग तेहचा 21-10, 18-21, 21-16 असा पराभव केला. यासह त्याने अंतिम फेरीत धडक मारली असून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याचे पहिले पदक निश्चित झाले आहे. शेवटच्या पाच गुणांसह त्याने तिसरा गेम जिंकला.
बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीच्या सामन्यात भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने दणदणीत विजय नोंदवला. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय जोडीने चॅन पेंग सून आणि टॅन कियान मेंग या मलेशियाच्या जोडीचा 21-6, 21-15 असा पराभव केला. यासह भारतीय जोडीने अंतिम फेरीत प्रवेश केला असून किमान रौप्यपदक निश्चित झाले आहे.
महिला दुहेरीत पराभव
बॅडमिंटनमध्ये महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या त्रिशा आणि गायत्री जोडीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मलेशियाच्या तानिया आणि टॅन या जोडीने भारतीय जोडीचा 31-13, 21-16 अशा फरकाने पराभव केला.