अकोला,दि.1 :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. येथील लोकशाही सभागृहात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी(रोहयो) बाबासाहेब गाढवे, उपजिल्हाधिकारी (पुनवर्सन) सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी व अधिकारी उपस्थित होते.