पातूर (सुनिल गाडगे) : येथील 132 के व्ही उपकेंद्र येथे सर्पमित्र कार्यशाळा नुकतीच पार पडली. सापाबद्दल संपूर्ण माहिती आणि त्याबाबत काळजी काय घ्यावी याबाबत मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
महापारेषण कंपनी अंतर्गत येणाऱ्या पातूर येथील 132 के व्ही उपकेंद्र येथे नुकतेच एका सर्पमित्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपकेंद्राचे उपकार्यकारी अभियंता मंगेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा पार पडली. यावेळी कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सर्पमित्र स्वप्नील सुरवाडे, संजय बंड प्रामुख्याने उपस्थित होते.
महापारेषणचे सर्व उपकेंद्र हे गावाच्या बाहेर असतात. आणि पावसाळ्यात साप निघण्याचे प्रमाण वाढलेले असते. यामुळे रात्र पाळीत काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना अनेकवेळा सर्प दंश होण्याचा धोका नाकारता येत नाही. अशावेळी आवश्यक काय काळजी घ्यावी. तसेच सर्पदंश झाल्यावर काय प्रथमोपचार करावा. आपल्या भागात आधळणाऱ्या सापांची माहिती अशा अनेक विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सापाबद्दल असणाऱ्या अंधश्रद्धा आणि वास्तव याबाबत अभ्यासपूर्ण माहिती सर्पमित्र स्वप्नील सुरवाडे यांनी दिली. स्लाईड शो च्या माध्यमातून यावेळी सविस्तर मार्गदर्शन सर्पमित्र संजय बंड यांनी केले. शेवटी अध्यक्षीय मनोगत मंगेश काळे साहेब यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक आणि संचालन गोपाल गाडगे यांनी केले तर अविनाश उमाळे यांनी आभार मानले.
याप्रसंगी निलेश देशमुख,प्रशांत कुकडे, नरेश उगले, संतोष राऊत, विनोद राठोड, संगीता बंड, वंदना देवकर आदी वीज कर्मचारी यांचेसह सुरक्षा विभागाचे अनिल चव्हाण, विनेश चव्हाण, गोपाल वगरे, हरिदास चव्हाण कर्मचारी उपस्थित होते.