तेल्हारा (विकास दामोदर)- पंचगव्हाण येथिल तेल्हारा पंचायत समिती सदस्य सौ. आम्रपाली सुमेध गवारगुरू यांच्या 15 व्या वित्त आयोग निधीतून गावाकऱ्यांच्या सोयीसाठी मुख्य रस्त्यावर पेव्हर ब्लॉक टाकण्यासाठी आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. ज्या मधे उदघाटक पं. स. सदस्य सौ. आम्रपाली सुमेध गवारगुरू, तरी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि. प सदस्य तथा माजी ता. महासचिव वंचित बहुजन आघाडी तेल्हारा सैफ़ुल्ला भाई होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी उपसभापती सचिन झापर्डे, सरपंच गब्बर जमदार, माझी सरपंच सादिकभाई, सरपंच यासिनभाई, सरपंच रेहान खान अनिल भाकरे उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते सुमेध गवारगुरू राजुबाप्पू देशमुख मुजमल्ल जमादार ऐनुउल्ला खान तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य शेख महमुद जाफर खान प्रफुल्ल मोरे अहमद खान बबु भाई शेख वकिल आदिल भाई इतर मान्यवर उपस्थित होते.
गावाकऱ्यांसाठी शासन स्तरावरील जास्तीत जास्त लोकोपोयोगी योजना कशा राबविल्या जातील यासाठी पं. स. सदस्य यांची सदैव धडपड सुरूच असते. व यावेळी उपस्थिताना संबोधित करतांना आम्रपाली गवारगुरू म्हणाल्या याही पुढे गावाच्या विकासासाठी, कल्याणासाठी आपले असेच अथक परिश्रम सुरु राहतील, या वेळी गावातील बहुतांश ग्रामवाशी तथा वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.