अकोला -: बाळापूर नगर परिषद अंतर्गत मध्ये काही नागरीक हे मागील १० ते १५ वर्षापासुन अतिक्रमण करुन राहत बाळापूर नगर आहे. त्यापैकी काही नागरीक त्या जागेवर पक्के बांधकाम करून राहत आहे व काही नागरीक कुळाचे बांधकाम करून राहत आहे. परंतू अद्यापपर्यंत त्यांना घर टॅक्स लागु करण्यात आलेले नाही. तसेच काही नागरीकांनी घर टॅक्स लागू करण्याकरीता आपल्या कार्यालयामध्ये कित्येक वर्षापासुन अर्ज सुध्दा दिलेले आहे तरीही त्यांनाही घर टॅक्स लागु करण्यात आलेले नाही. नागरीकांना शासकीय कामाकरीता व शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याकरीता घर टॅक्स पावतीची आवश्यता असते परंतू नागरीका कडे घर टॅक्स पावती नसल्यामुळे त्यांना अनुदानपासुन वंचित रहावे लागते. तसेच काही नागरीकांना नविन राशन कार्ड बनवायचे आहे परंतू त्यांच्याकडे टॅक्स पावती नसल्यामुळे त्यांना राशन कार्ड मिळणे सुध्दा कठीण झाले आहे. घर टैक्स लागू केल्यामुळे मिळणान्या टॅक्स ची रक्कम ही इतर विकास कामाकरीता वापरता येईल.
तरी आपणास विनंती आहे की, ज्या नागरीकांना घर टॅक्स लागु नाही त्यांना लवकरात लकवर घर टॅक्स लागू करण्यात यावे अन्यथा अशोका फाऊंडेशन तर्फे तिव्र आंदोलन छेडण्यात येईल याची दखल घ्यावी. यावेळी निवेदन देताना उपस्थित अशोका फाउंडेशन बाळापुर अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके मनीष तायडे सचिन पाटील महेश तायडे अनुराग तायडे दीपक तायडे शुभम उपरवट यश उमाळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.