पातूर (सुनिल गाडगे) दि.१२/०७/२०२२ रोजी श्रीराम सेनेच्या वतीने मा.तहसीलदार ,गट विकास अधिकारी तसेच ग्रामविकास अधिकारी यांना कावड यात्रेच्या मार्गाचे दुरुस्तीसाठी निवेदन देण्यात आले.
श्री. सिदाजी महाराज व्यायाम शाळा तसेच श्रीराम सेना यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे श्रावण महिन्यात कावड यात्रा पालखिचे आयोजन करण्यात येत असून पालखीचा मार्ग ढोणे नगर खानापूर रोड पातूर TKV चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक असा असून सदर रस्त्याची खूपच दयनीय अवस्था झाली आहे.
पादचारी तसेच ईतर नागरिकांना पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे. त्यातच भरीस भर शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक विद्युत खांबावरील लाईटसुद्धा बंद पडलेले आहेत. तसेच पालखी मार्गात रस्त्यावर अनेक खड्डे सुद्धा पडलेले आहेत. त्यामुळे कावड पालखी घेऊन चालणे सुद्धा कठीण होणार आहे. त्या निमित्ताने या वरील अडचणी वर शक्य तेव्हढ्या लवकर योग्य कारवाई करून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यावेळी श्री श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळचे अध्यक्ष मंगेश गाडगे, सुरेश श्रीनाथ, मधुकर उगले,अजय पाटील,प्रफुल कुरई,राहुल उगले, स्वप्नील परमाळे, करण गहिलोत,पवन तायडे, महेश बोचरे, अजय हाडके, अक्षय तायडे, अक्षय बंड, अक्षय श्रीनाथ, निखिल बारताशे, सागर माहुलीकर, मंगेश निमकंडे,विशाल काळे, प्रथमेश घोरे,जगदीश पुरुषोत्तम, धीरज बंड, हृतिक बारताशे व इतर बजरंगी उपस्थित होते.