अकोला दि.12: आषाढीवारीमध्ये मानाच्या दहा पालख्यांना राष्ट्रीय व राज्य महामार्गावरुन पढंरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांच्या पालख्या, वारकरी व त्यांच्या वाहनांना पथकरातुन शासन परिपत्रकानुसार शुक्रवार दि. 15 जुलैपर्यंत सुट देण्यात आली आहे.
या पालख्यांना ज्या मार्गावरुन जातात त्या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग व प्राधिकरण यांचे पथकर स्थानकांवर वारकऱ्यांच्या हलक्या व जडवाहनांसाठी पथकरातून सुट देण्यासाठी पथकर सवलत पास उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी परिवहन विभाग, वाहतुक पोलीस व पोलीस विभाग ग्रामीण, शहरी व पोलीस चौकी येथे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी व वारकऱ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस विभाग व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले.