अकोला- कच्छी मेमन जमाततर्फे यावर्षी दहावी आणि बारावीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यासोबतच कोरोनाच्या काळात अंतिम संस्कार करणाऱ्या जावेद झकेरिया यांच्या टीममधील सदस्यांच्या धर्मपत्नींचासुद्धा जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला डॉ. अमोल रावणकर, अॅड. मोहम्मद परवेज, विदर्भ मेमन जमातचे अध्यक्ष बिलाल ठेकिया, हशम सेठ ट्रस्टचे अध्यक्ष हाजी यासीन कपाड्या आदी उपस्थित होते. संचालन जावेद झकेरिया यांनी केले. आभार हनिफ मलिक यांनी मानले. कार्यक्रमात अकोला जिल्हा अधिकारी यांनी शिक्षणाबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगून यशस्वी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. यशस्वी विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देण्यात आले. यासोबतच उच्च शिक्षण घेतलेल्या जमातच्या सर्व सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.